भारताची राज्यघटना ‘हिंदूराष्ट्रा’च्या स्वप्नाने झपाटलेल्यांसाठी मोठी डोकेदुखीच होऊन बसली आहे!
‘संसदीय राज्यपद्धती भिकार असून तिचा त्याग करण्याची गरज आहे, असे हिंदुत्वाच्या पाशवी व हिंसक तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते वारंवार व अगदी उघडपणे बोलून दाखवीत. बहुधा म्हणूनच की काय, ज्या मातीत गांधी जन्मले व लहानाचे मोठे झाले, त्याच भूमीची त्यांनी सर्वप्रथम निवड केली असावी. मग वाटते, अत्यंत बेमुर्वतखोरपणे घटनेशी चाललेला हा खेळ आधुनिक भारताला पाहवला तरी कसा? आणि त्या खेळाबरोबर देशाने कसे काय जुळवून घेतले असेल?.......